भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत प्रकारें भक्तहि असती । देवहि भेटती तयां तैसे

bahut prakaren bhaktahi asati | devahi bhetati tayan taise

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहुत प्रकारें भक्तहि असती । देवहि भेटती तयां तैसे ॥१॥ तैसा नोहे माझा पंढरीचा राव । देवाधिदेव मुकुटमणी ॥२॥ एकविध तया शरण पैं जातां । मोक्ष सायुज्यता पाठीं लागे ॥३॥ ऐसा लावण्य पुतळा देखिला दृष्टी । जनार्दनीं सुख न समाये सृष्टीं ॥४॥