भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु जन्मांचे सायास । विटे उभा हृशेकेश । पाहे पुंडलीकास । सम चरणीं

bahu janmanche sayas | vite ubha hrushekesh | pahe pundalikas | sam charanin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहु जन्मांचे सायास । विटे उभा हृशेकेश । पाहे पुंडलीकास । सम चरणीं ॥१॥ जाई जाई पंढरपुरा । स्नान करीं तूं भीवरा । जन्माचातो फेरा । तेणें चुके ॥२॥ व्रत करीं एकादशी । जागरण अहर्निशीं । संतसभे सरसी । टाळी वाहे ॥३॥ आळस तूं न करीं । वाचे म्हणे विठ्ठल हरी । सांडोनियां थोरीं । नाम घे आवडी ॥४॥ जनीं वसे जनार्दन । एका दृढ धरी चरण । अर्पियेल तनमन । विठ्ठल वाचे ॥५॥