भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

पाहतां पाहतां वेधलें मन । झालें उन्मन समाधिस्था ॥१॥ ऐसा परब्रह्मा पुतळा देखिलासे डोळा । पाहिला सावळा डोळेभरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पांहता पाहता वेधलेंसे मन । तेणें समाधान जीवशिवां ॥१॥ जीवांचें जीवन मनाचें मोहन । वाचेसी मौन्य सदा पडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहतां विश्राम सुखवस्ती धाम । पंढरी पुण्यग्राम भुमीवरी ॥१॥ जावया उद्वेग धरिला माझा मने । उदंड शाहाणें तये ठायीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहतो देखतो कानीं जें ऐकतो । परी सदाचि पाहतो संसार मनीं ॥१॥ मीनाचिये परी गुंतलासे जळीं । परी संसारा कवळी अधम तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहुनियां हरी गोपाळांचे चोज । म्हणे येणें तो निर्वाणीचें निज मांडियले ॥१॥ मेठा खुंटीं येउनी हुंबरी घालिती । खर तोंडाप्रती येती जाहली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहुनी कृष्णासी आनंद मानसी प्रेमभरित अहर्निशीं कृष्णनामें ॥१॥ आजीं कां वो कृष्ण आला नाहीं घरां । करती वेरझारा नंदगृहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहुनी दशदिशा नामा रडूं लागे । कां बा पांडुरंगे ऐसे केलें ॥१॥ चरणाचा माग येथवरी आला । येथें गुप्त जाहला करुं काय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहूं गेलिये हरि जागरा । नयन लांचावले नंदकुमारा ॥१॥ तान्हया रे मनमोहना । देहगेहाची तुटली वासना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पाहूनियां गोरा दंडवत घाली । म्हणे कोण स्थळीं वस्ती तुम्हां ॥१॥ पंढरीसी राहतों परदेशी आम्ही । नाम तरी स्वामीं विठु माझें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

पिकली पंढरी पिटिला धांडोरा । केणें आलें घरा सभागियांच्या ॥१॥ चंद्रभागे तीरीं उतरले बंदर । आले सवदागर साधुसंत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ