भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहूं गेलिये हरि जागरा । नयन लांचावले नंदकुमारा

pahun geliye hari jagara | nayan lanchavale nandakumara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहूं गेलिये हरि जागरा । नयन लांचावले नंदकुमारा ॥१॥ तान्हया रे मनमोहना । देहगेहाची तुटली वासना ॥२॥ आदरें आवडी ऐकतां नाम । नाममात्रें जालों निष्काम ॥३॥ एका जनार्दनीं हरिकीर्तन । समाधीसी तेथें समाधान ॥४॥