भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहों गेलों देवालागीं । देवरुप झालों अंगीं

pahon gelon devalagin | devarup jhalon angin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहों गेलों देवालागीं । देवरुप झालों अंगीं ॥१॥ मीतुंपणा ठाव । उरला नाहीं अवघा देव ॥२॥ सुवर्णाचीं झाली लेणीं । देव झाला जगपणीं ॥३॥ घटीं मृत्तिका वर्तत । जगीं देव तैसा व्याप्त ॥४॥ एकानेक जनार्दन । एका जडला एकपणें ॥५॥