भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिकली पंढरी पिटिला धांडोरा । केणें आलें घरा सभागियांच्या

pikali pandhari pitila dhandora | kenen alen ghara sabhagiyanchya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पिकली पंढरी पिटिला धांडोरा । केणें आलें घरा सभागियांच्या ॥१॥ चंद्रभागे तीरीं उतरले बंदर । आले सवदागर साधुसंत ॥२॥ वैष्णव मिळोनि केला असे सांठा । न घेतो करंटा अभागीया ॥३॥ एका जनार्दनीं आलें गिर्‍हाईक । वस्तु अमोलिक सांठविली ॥४॥