भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहुनी दशदिशा नामा रडूं लागे । कां बा पांडुरंगे ऐसे केलें

pahuni dashadisha nama radun lage | kan ba pandurange aise kelen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहुनी दशदिशा नामा रडूं लागे । कां बा पांडुरंगे ऐसे केलें ॥१॥ चरणाचा माग येथवरी आला । येथें गुप्त जाहला करुं काय ॥२॥ का हो केशिराजा अवकृपा केली । माझी सांडी सांडिली देवराया ॥३॥ एका जनार्दनीं रडतां नामदेव । पाहिलेंसे तेव्हां सांवत्यानें ॥४॥