भजनी मालिका
← भजनांकडे परत

पाहतां पाहतांभुललें मन । धरिलें चरण हृदयीं

pahatan pahatambhulalen man | dharilen charan hrudayin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पाहतां पाहतांभुललें मन । धरिलें चरण हृदयीं ॥१॥ वेधें वेधिला जीव प्राण । ब्रह्माज्ञान नावडे ॥२॥ तीर्थाचे जें अधिष्ठान । पुण्यपावन चंद्रभागा ॥३॥ सकळ देवांचा देव उभा । एका जनार्दनीं गाभा लावण्याचा ॥४॥