भजनी मालिका
← भजनांकडे परत

पांहता पाहता वेधलेंसे मन । तेणें समाधान जीवशिवां

panhata pahata vedhalense man | tenen samadhan jivashivan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
पांहता पाहता वेधलेंसे मन । तेणें समाधान जीवशिवां ॥१॥ जीवांचें जीवन मनाचें मोहन । वाचेसी मौन्य सदा पडे ॥२॥ परादिकां ज्याचा न कळेचि अंत । सर्व गुणातीत भेदरहित ॥३॥ एका जनार्दनीं त्रिगुण परता । ओतप्रोत सर्वथा भरलासे ॥४॥