भजनी मालिका

भजने

येइना अझुनी श्रीकृष्ण सदना । गोंवळा रक्षणा मायबाप ॥१॥ लावुनि आशा फिरविशी दिशा । प्रेमभाव कैसा दावीं आतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येई गां तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीन वाटे क्षीण जाली काय ॥१॥ याती हीन मती हीन कर्म हीन माझे । सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥१॥ पडियेलों वनीं थोर चिंतवनी । उशीर कां अझूनि लावियेला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

येईं गे केशवे मज तुझी सवे । तुजविण नुगवे दीन माये ॥१॥ तूं माय जननी कांसवी कौसल्या । दिन बहुसाळ मज पावें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येई गे विठ्ठले अनाथाचे नाथे । माझे कुळदैवते पंढरीचे ॥१॥ पंच प्राणांचा उजळोनि दिपक । सुंदर श्रीमुख ओवाळीन ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं जनार्दने जनवनसंपन्ने । माझे वो चिद्‍घने पांडुरंगे ॥१॥ त्राहे जनार्दने पूर्णानंदघने । येईं वो संपन्ने विश्वंभरे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं तूं उपेंद्रे विठ्ठ महिंद्रे । देवामाजी भद्रे सिंहासनीं ॥१॥ त्राहे वो जननी शिणलों गे माये । तुजविण आहे कवण मज ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं तूं कृपाळे संकर्षण माते । पवित्र पूर्णभरिते गुण-निधि ॥१॥ त्राहेत्राहे वेगीं पावें वो झडकरी । ब्रीद चराचरीं वर्णि-ताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं तूं गोविदें नामामृतधारी । नित्य तें उच्चारीं गो-बिंदातें ॥१॥ गोविंद नित्य हाचि छंद । पावें तूं हद्नद आदिरूपें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं तूं पुरुषोत्तमे संजीवनी रामे । योगिया विश्रामे पुरुषश्रेष्ठा ॥१॥ त्राहे मनोधर्म नाम पुरुषोत्तम । साधन अगम ऐसी माये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं तूं मधुकरे मदनसुंदरे । मज गे न धरे प्रेम पोटीं ॥१॥ तूं माझी जननी मधुसूदन गाय । कामधेनु होय कांसवीची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं तूं शारंगे वासुदेवे त्वरें । वासुदेवो सारे गोपाळ वो ॥१॥ त्राहे वासुदेवा पावें झडकरी । त्वरें वेगू करीं आर्त भेटी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं तूं हरीरूपेम विठ्ठल स्वरूपे । कळिकाळ कांपे नाम घेतां ॥१॥ नामें हरिहरि त्राहे वो झडकरी । शिणलों मी भारी जननीये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं तूम प्रद्युन्ने ध्यान तूं धरणें । माझिये कल्पने निर्धा-रुसा ॥१॥ त्राहे झडकरी पावे वो लवकरी । प्रद्युम्ने फुपकारी वेळो-वेळां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं वो अच्युते नामामृत रसे । सुंदर डोळसे जा-न्हवीये ॥१॥ अमृताची खोटी अच्युतनाम पेठीं । पावे वो जगजेठी अच्युतसार ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येईं वो अनिरुद्धे सांबळें प्रबुद्धे । बिराटे गोविंदे दाव वेगीं ॥१॥ त्राहे माउलीये मना तुझी सोय । चुकती अपाय नाम घेतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव