भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं जीवाचिया जीवा । रामा देवाचिया देवा

yein jivachiya jiva | rama devachiya deva

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं जीवाचिया जीवा । रामा देवाचिया देवा ॥१॥ सर्व देव बंदीं पडिले । रामा तुम्ही सोडविले ॥२॥ मारूनियां लंकापती । सोडविली सीता सती ॥३॥ देवा तुमची ऐसी ख्याती । रुद्रादिक ते वर्णिती ॥४॥