भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं तूं कृपाळे संकर्षण माते । पवित्र पूर्णभरिते गुण-निधि

yein tun krupale sankarshan mate | pavitra purnabharite gun-nidhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं तूं कृपाळे संकर्षण माते । पवित्र पूर्णभरिते गुण-निधि ॥१॥ त्राहेत्राहे वेगीं पावें वो झडकरी । ब्रीद चराचरीं वर्णि-ताती ॥२॥ संकर्षण गंगा सर्वांगीं तूं असे । जनीं वनीं दिसे रूप तुझें ॥३॥ कटावरी कर सांवळी सुंदर । मना़चा विचार इच्या चरणीं ॥४॥ निर्धारु सांगतां न माये वो घेतां । संकर्षण माता पाव वेगीं ॥५॥ विष्णुसंकर्षण नाम हें गहन । पतितपावन चरण-रजें ॥६॥ नामा म्हणे माय संकर्षण गाय । हरिदासा पान्हावे पंढरीसी ॥७॥