भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं तूं गोविदें नामामृतधारी । नित्य तें उच्चारीं गो-बिंदातें

yein tun goviden namamrutadhari | nitya ten uchcharin go-bindaten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं तूं गोविदें नामामृतधारी । नित्य तें उच्चारीं गो-बिंदातें ॥१॥ गोविंद नित्य हाचि छंद । पावें तूं हद्नद आदिरूपें ॥२॥ गोविंद हो ध्यानें निवती अष्टांगे । गोविंदे गे बेगें वेष धरूं ॥३॥ गोविंद गोपाळ मुकुंद केशरी । येईं तूं लवकरी सांवळिये ॥४॥ गोविंद हें नाम जनीं वनीं दिसे । प्रत्यक्ष तें ठ ए पंढरीसी ॥५॥ वेणूनादीं काला गोविंदे पैं केला । धांवतचि आला पेंद्यापाशीं ॥६॥ ती हीच वो माय उभी बाळमूर्ती । नाम जे जपती पांडुरंग ॥७॥ नामा म्हणे सांग गोविंद हा दवडी । वेगें लवडसवडी करीं माये ॥८॥