भजनी मालिका
← भजनांकडे परत

येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां

yei ga viththala yei ga viththala | pran ha phutala alavitan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥१॥ पडियेलों वनीं थोर चिंतवनी । उशीर कां अझूनि लावियेला ॥ध्रु.॥ काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां ॥२॥ तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे ॥३॥