भजनी मालिका
← भजनांकडे परत

येई गा बापा हरि तू बा कृपानिधी

yei ga bapa hari tu ba krupanidhi

रचनाकार: संत बोधले · अभंग
येई गा बापा हरि तू बा कृपानिधी । दिनालागी आधी सांभाळावे ॥१॥ आले म्हणुनी कृपादृष्टी पाही । उचलूनि घेई ये कडी बापा ॥२॥ तूंचि आमची माता तूंचि आमचा पिता । तुजविण सर्वथा नेणे काही ॥३॥ बोधला म्हणे देवा मी तुझा दिन । माझा अभिमान आहे तुज ॥४॥