भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं जनार्दने जनवनसंपन्ने । माझे वो चिद्‍घने पांडुरंगे

yein janardane janavanasampanne | majhe vo chid‍ghane pandurange

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं जनार्दने जनवनसंपन्ने । माझे वो चिद्‍घने पांडुरंगे ॥१॥ त्राहे जनार्दने पूर्णानंदघने । येईं वो संपन्ने विश्वंभरे ॥२॥ नाम हें दुर्लक्ष जनकजननी । राम जनार्दनीं विनटली ॥३॥ सांवळी डोळस रवि एकासनी । तेज प्रकाशनी हिरियाची ॥४॥ जननी ते जननी निकट ते जीवनी । जग प्रगटिणी हरीयाची ॥५॥ नामा ह्मणे जन नाम जनार्दन । सनकादिक जाण सेवताती ॥६॥