भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं तूं मधुकरे मदनसुंदरे । मज गे न धरे प्रेम पोटीं

yein tun madhukare madanasundare | maj ge na dhare prem potin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं तूं मधुकरे मदनसुंदरे । मज गे न धरे प्रेम पोटीं ॥१॥ तूं माझी जननी मधुसूदन गाय । कामधेनु होय कांसवीची ॥२॥ आ-नंद निजघने जुनाट मधुसूदने । शुकस्तनपान पाजीं पान्हा ॥३॥ क-शव कांसवी पद रानगाय । आत्माराम होय नि:संदेह ॥४॥ विठ्ठलमु-कुंदें स्वरूपें गोमटीं । आकांतली सृष्टी मधुसूदनें ॥५॥ शंखचक्रांकित आयुध्यें मंडीत । मुकुट शोभत तुझा शीरीं ॥६॥ भक्तवरदायनी मधुसूद-नगंगा । व्हावें तूं वो वेगा कामधेनु ॥७॥ नामा म्हणे माये मधुसूदन गाय । ते संजीवनी होय आम्हालागीं ॥८॥