भजनी मालिका

भजने

हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥१॥ विश्वंभरें विश्व सामाविलें पोटी । तेथें चि सेवटीं आम्ही असों ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥१॥ अतेता समय नेणतां अवकळा । येऊं नये बाळा सिक धरा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥ घररिघी झालें पट्टराणी बळें । वरीलें सांवळें परब्रम्ह ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

हाचि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥१॥ बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हाचि माझा नेम धरिला हो धंदा । यावरी गोविंदा भेटी द्यावी ॥१॥ हाचि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

हाट करी आम्ही आठवडे मुळींचे । पंढरपुरीचे वारकरी ॥१॥ खेप ठिकाणाची वस्तु सवंगाची । सवाई निढळाची उणी नव्हे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

हाटकर कुणबी वाटा मोडी । रिकामा ब्राम्हण करितो चहाडी ॥१॥ गुळेंविण शिंपी बोटें चाटी । प्रेमेंविण तेली क्षेम दे लाटी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव