भजनी मालिका
← भजनांकडे परत

हाचि माझा नेम धरिला हो धंदा । यावरी गोविंदा भेटी द्यावी

hachi majha nem dharila ho dhanda | yavari govinda bheti dyavi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हाचि माझा नेम धरिला हो धंदा । यावरी गोविंदा भेटी द्यावी ॥१॥ हाचि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥ डोळियांची भूक पहातां श्रीमुख । आलिंगणे सुख निवती भुजा ॥२॥ बहु चित्त ओढे तयाचिये सोई । पुरला हाकांहीं नवसे नेणें ॥३॥ बहुबहु काळ झालों कासावीस । वाहिले बहुवस कलेवर ॥४॥ तुका म्हणे आतां पाडावें हें ओझें । पांडुरंगा माझें इयावरी ॥५॥