भजनी मालिका
← भजनांकडे परत

हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया

ha ton navhe kanhin nirashecha thav | bhalen potin vav rakhiliya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥१॥ विश्वंभरें विश्व सामाविलें पोटी । तेथें चि सेवटीं आम्ही असों ॥ध्रु.॥ नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं उमटेल ॥२॥ तुका म्हणे माझ्या स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥३॥