भजनी मालिका

भजने

साधुनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहावे ॥१॥ साधुनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

साधुसंतजना करितों प्रार्थना । भेटवा देवराणा द्वारकेचा ॥१॥ तनमन प्राण वेधले त्याचे पायीं । येऊनियां राही ह्रदयकमळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥ वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

सानपणें तरले अनंत भक्त अपार । जाणिवेचा भार टाकूनियां ॥१॥ सानपणें शुक व्यास नारदमुनि । जाहले मुगुटमणी सानपणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सानपणें धूरु अढळी बैसला । सानपणें केला कृतकृत्य ॥१॥ सानपणें प्रल्हादें साधियेलें काज । सानपणें सहज बळी पूजी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सानपणें साधे सर्व येत हातां । जाणीवेने तत्त्वती नागवशी ॥१॥ महापुर येतां वृक्ष तेथें जाती । लव्हाळें राहती नवल कैंचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सानुले तानुले राम आणि कृष्ण । गोकुळीं विंदान दाविताती ॥१॥ गाई राखिताती लोनी चोरिताती । अकळ खेळताती नानापरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

सांपडलें होतों भ्रमाचियां जाळीं । मायामोहकल्लोळीं भ्रमत होतों ॥१॥ परी जनार्दनें केलोंसे मोकळा । दवडुनी अवकळा आशा तृष्णा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ