भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांपडला संदीं । मग बळिया पडे बंदीं

sampadala sandin | mag baliya pade bandin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांपडला संदीं । मग बळिया पडे बंदीं ॥१॥ ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ध्रु.॥ दाता मागे दान । जाय याचका शरण ॥२॥ तुका म्हणे नेणां । काय सांगों नारायणा ॥३॥