भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी

sadhuchya darshana lajasi gavhara | veshyechiya ghara pushpen nesi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥ वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥ तुका म्हणे आतां लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥३॥