भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांपडला ठेवा । आतां पात्र झालों देवा

sampadala theva | atan patra jhalon deva

रचनाकार: संत निळोबा · अभंग
सांपडला ठेवा । आतां पात्र झालों देवा ॥१॥ माझया वडिलांची हे जोडी । होती पुरातन चोखडी ॥२॥ जुगादीचें जुनें । टांकसाळी खरें नाणें ॥३॥ निळा म्हणे माझया देवें । हातीं लागलें पडिलें ठावें ॥४॥