भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांपडलें होतों भ्रमाचियां जाळीं । मायामोहकल्लोळीं भ्रमत होतों

sampadalen hoton bhramachiyan jalin | mayamohakallolin bhramat hoton

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांपडलें होतों भ्रमाचियां जाळीं । मायामोहकल्लोळीं भ्रमत होतों ॥१॥ परी जनार्दनें केलोंसे मोकळा । दवडुनी अवकळा आशा तृष्णा ॥२॥ मीनाचिये परीतळमळ संसारीं । माझे माझें भोवरीं दृढ धरित ॥३॥ ते परतें करुनी केलेंसे सरतें । आपणापरौतें जाऊं नेदी ॥४॥ जनार्दनाचा एका लडिवाळ तान्हा । पाजी प्रेमपान्हा जनार्दन ॥५॥