भजनी मालिका
← भजनांकडे परत

सानपणें साधे सर्व येत हातां । जाणीवेने तत्त्वती नागवशी

sanapanen sadhe sarva yet hatan | janivene tattvati nagavashi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सानपणें साधे सर्व येत हातां । जाणीवेने तत्त्वती नागवशी ॥१॥ महापुर येतां वृक्ष तेथें जाती । लव्हाळें राहती नवल कैंचे ॥२॥ चंदनाचे संगें तरुवर चंदन । सानवण कारण संगतीचें ॥३॥ संतांचे संगतीं अभाविक तरती । एका जनार्दनीं निश्चितीं सानपणें ॥४॥