भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधुसंतजना करितों प्रार्थना । भेटवा देवराणा द्वारकेचा

sadhusantajana kariton prarthana | bhetava devarana dvarakecha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
साधुसंतजना करितों प्रार्थना । भेटवा देवराणा द्वारकेचा ॥१॥ तनमन प्राण वेधले त्याचे पायीं । येऊनियां राही ह्रदयकमळीं ॥२॥ गोपाळाचे मेळीं खेळे वनमाळी । यमुने पाबळी वेणु वाहे ॥३॥ शंख चक्र करीं मोरपिच्छ शिरीं । कानीं मकराकारी मुक्ताफळें ॥४॥ गळां वनमाळा कासे सोबसळा । देखूनि व्रजबाळा तन्मय झाल्या ॥५॥ नंदाचे नंदनें मोहियेलें मन । लामलेंसे ध्यान गोविंदाचें ॥६॥ विठा नामयाचा चरणींचा रज । भेटवा यादवराज द्वारकेचा ॥७॥