भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें

sampadalen junen | amuchya vadilanchen thevanen

सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें । केली नारायणें । कृपा पुण्यें पूर्वीचिया ॥१॥ सुखें आनंदरूप आतां । आम्ही आहों याकरितां । निवारिली चिंता । देणें घेणें चुकलें ॥२॥ जालें भांडवल घरीचें । अमूप नाम विठ्ठलाचें । सुकृत भावाचें । हें तयानें दाविलें ॥३॥ तुकयाबंधु म्हणे फिटला । पांग नाहीं बोलायाला ॥ चाड दूसरी विठ्ठला । वांचूनियां आणिक ॥४॥