भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां कळों आले गुण । अवघेचे यावरून

atan kalon ale gun | avagheche yavarun

आतां कळों आले गुण । अवघेचे यावरून । चोखट लक्षण । धरिलें हें घरघेणें ॥१॥ या नांवें कृपासिंधु । म्हणवितोसी दिनाबंधु । मज तरी मैंदू । दिसतोसी पाहतां ॥२॥ अमंळ दया नाहीं पोटीं कठिण तैसाचि कपटी । आंधळ्याची काठी । माझी गुदरसीच ना ॥३॥ तुकयाबंधु म्हणे पूरता । नाहीं म्हूण बरें अनंता । एरवीं असतां । तुझा घोंट भरियेला ॥४॥