भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र

atan chukalen deshavar | karanen akaranen sarvatra

आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र । घरासी अगर । आला सकळ सिद्धींचा ॥१॥ जालों निधाई निधानें । लागलें अनंतगुणरत्‍न । जन्माचें विच्छिन्न । दुःख झालें दारिद्र ॥२॥ तारूं सागरिंचें अवचितें । हेंदोवले आले येथें । ओढिलें संचितें । पूर्वदत्तें लाधलें ॥३॥ तुकयाबंधु म्हणे सीमा । नाहीं आमुचिया दैवा । आतां पुरुषोत्तमा । ऐसा सौदागर सांपडला ॥४॥