भजनी मालिका
← भजनांकडे परत

साध्यसाधनकाज निवृत्तिचें गुज

sadhyasadhanakaj nivruttichen guj

साध्यसाधनकाज निवृत्तिचें गुज । केशव सहज सर्वंभूतीं ॥१॥ रामकृष्ण मंत्रें प्रोक्षियेलीं गात्रें । हरिरुप सर्वत्र क्षर दिसे ॥२॥ गुरुगम्य चित्त जालें माझें हित । दिनदिशीं प्राप्त हरि आम्हां ॥३॥ पूर्णिमाप्रकाशचंद्र निराभास । हरि हा दिवस उगवला ॥४॥ चकोरें सेवीति आळीउळें पाहाती । घटघटा घेती अमृतपान ॥५॥ ऐसें हें पठण ज्ञानदेवा जालें । निवृत्तीनें केलें आपणा ऐसें ॥६॥