भजनी मालिका

भजने

भुजंग विखार पवनाचा आहार । परि योगेश्वर म्हणों नये ॥१॥ पवनाच्या अभ्यासें काया पालटी । परि तो वैकुंठीं सरता नहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भुललें ते प्राणी विसरले कीर्तना । अंतीं त्या पतना वारी कोण ॥१॥ जयांसी नावडे हरींचें किर्तन । ते जाणावे पाषाण कलीमाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भुलले पामर नेणती ते शुद्धी । बुडतील भवनदीमाजीं जाणा ॥१॥ म्हणवोनि येत करूणा । परी संतचरनां न लागती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भुलले हे लोक काळाचें कौतुक । सुरशक्रादिक पाह-ताती ॥१॥ देवा तुझी माया अगम्य अगाध । प्रपंचाचा वेध सुटों नेदी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भुलविला राजा लावण्याच्या तेजें । नेम व्रतराज खोळंबिला ॥१॥ राजपत्नीपुत्र नाम धर्मांगद । चालवी सुबुध्द एकादशी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हांवें भार वाढला ॥१॥ कुळिकेसी लांस फांस । डोई दाढी बोडवी दोष । अविहितनाश । करवी वजन चुकतां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भूचरी खेचरी चांचरी निश्चळा । अगोचरी डोळा स्थिरावली ॥१॥ झांकिली समाधी संतसज्जनांनीं । तुलसी पुष्पें वरूनि वर्षताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भूत भविष्य कळों येईल वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥१॥ आह्मीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धेंचि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें ॥१॥ शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भूतमात्र आकृति एकचि मूर्ती । अवघा अंतर्गति व्यापुनी ठेला ॥१॥ जळीं स्थळीं कांष्ठीं स्थावर जंगम । अवघा आत्माराम पूर्णपणे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भूतळीचीं तीर्थें नामा जंव करी । गांजीयेलें पोरी नामयाच्या ॥१॥ तुमचें ठेवणें खेचराचे पायीं । आणिकाचे वाहीं पडों नका ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भूतीं उपद्रव दिधला । ताडिला अथवा निस्तेजिला । तेणें चित्ती दाहो जाला । अधिभौतिक बोलिला तो ताप ॥१॥ देहीं प्रगटे रोगव्याधी । तेणें आहाळली तापे बुध्दी । लोळे न पुरे दु:खावधी । आध्यात्मिक त्रिशुध्दि तो ताप ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भूतीं देव म्हणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥१॥ जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम