भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूत झालें ऋषि पोटीं । लावियेलें मृगापाठीं

bhut jhalen rushi potin | laviyelen mrugapathin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भूत झालें ऋषि पोटीं । लावियेलें मृगापाठीं ॥१॥ विश्वामित्रा घाला घाली । पोटीं शकुंतला आली ॥२॥ भगांकित केला । इंद्र भूतानें झडपिला ॥३॥ तेंचि झालें हें भारत । म्हणे जनी केली मात ॥४॥