भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूतळीचीं तीर्थें नामा जंव करी । गांजीयेलें पोरी नामयाच्या

bhutalichin tirthen nama janv kari | ganjiyelen pori namayachya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भूतळीचीं तीर्थें नामा जंव करी । गांजीयेलें पोरी नामयाच्या ॥१॥ तुमचें ठेवणें खेचराचे पायीं । आणिकाचे वाहीं पडों नका ॥२॥ वायां मृगजळ दाविसील आम्हां । सर्वथा पुरुषोत्तमा न सोडीं मी ॥३॥ झोंडाचें ठेवणें ठेवावें कवणें । झोंडापरिस होणें झोंड जेणें ॥४॥ नामायाचा विठा झोंड पैं झाला । बिठो उभा केला भक्तिसुखें ॥५॥