भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूतबाधा आम्हां घरीं । हें तों आश्चर्य गा हरी

bhutabadha amhan gharin | hen ton ashcharya ga hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भूतबाधा आम्हां घरीं । हें तों आश्चर्य गा हरी ॥१॥ जाला भक्तीचा कळस । आले वस्तीस दोष ॥ध्रु.॥ जागरणाचें फळ । दिली जोडोनि तळमळ ॥२॥ तुका म्हणे देवा । आहाच कळों आली सेवा ॥३॥