भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुलले पामर नेणती ते शुद्धी । बुडतील भवनदीमाजीं जाणा

bhulale pamar nenati te shuddhi | budatil bhavanadimajin jana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भुलले पामर नेणती ते शुद्धी । बुडतील भवनदीमाजीं जाणा ॥१॥ म्हणवोनि येत करूणा । परी संतचरनां न लागती ॥२॥ खरें खोटें ऐसें न कळेचि जीवा । कां न भीति भेवा यमाचिया ॥३॥ एका जनार्दनीं किती हें सागावेरं । उगवेना दावें गळां बंध ॥४॥