भजनी मालिका
← भजनांकडे परत

भुलले हे लोक काळाचें कौतुक । सुरशक्रादिक पाह-ताती

bhulale he lok kalachen kautuk | surashakradik pah-tati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भुलले हे लोक काळाचें कौतुक । सुरशक्रादिक पाह-ताती ॥१॥ देवा तुझी माया अगम्य अगाध । प्रपंचाचा वेध सुटों नेदी ॥२॥ माझें घरदार माझा संसार । मी मोठा चतुर ह्मणोनियां ॥३॥ आपणा देखतां जाती तें पाहती । मीपणाची भ्रांति सुटों नेणे ॥४॥ नामा ह्मणे आतां काय म्यां बोलावें । भोंवत असावें चौर्‍यांशीला ॥५॥