भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हांवें भार वाढला

bhuk potapurati | trushna bharavi vakhati | karavi phajiti | hanven bhar vadhala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हांवें भार वाढला ॥१॥ कुळिकेसी लांस फांस । डोई दाढी बोडवी दोष । अविहितनाश । करवी वजन चुकतां ॥ध्रु.॥ विधिसेवनें विहितें । कार्यकारणापुरतें । न वाटे तोचित्तें । अधमांच्या तो त्यागी ॥२॥ आज्ञा पाळणें ते सेवा । भय धरोनियां जीवा । तुका म्हणे ठेवा । ठेविला तो जतन ॥३॥