बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव
bolava viththal pahava viththal | karava viththal jivabhav
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥
bolava viththal pahava viththal | karava viththal jivabhav
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥
bolavilyavanchuni ala | ubha pathisi thakala | avachit pundaliken dekhila | mag pujila upacharin
बोलाविल्यावांचूनि आला । उभा पाठीसी ठाकला । अवचित पुंडलिकें देखिला । मग पुजिला उपचारीं ॥१॥ म्हणे आजी हें नवल झालें । मज अनाथा सांभाळिलें । ब्रीद आपुलें साच केलें । सुयाणें घडलें स्वामीचें ॥२॥
bolavuni ekantasi | sange vidyaabhyasasi
बोलावुनी एकांतासी । सांगे विद्याअभ्यासासी ॥१॥ सकळ विद्यांचें जीवन । मनीं धरी नारायण ॥२॥
bolavun pathavun evadhi kainchi shakti | ya rang shripati tvan ba yaven
बोलावूं पाठवूं एवढी कैंची शक्ति । या रंग श्रीपती त्वां बा यावें ॥१॥ येईं गा विठ्ठला पाहातसें आतां । या रंगा अनंता त्वां बा यावें ॥२॥
bolavuni avaghinyaten | kans pahe vicharaten
बोलावूनी अवघींयातें । कंस पाहे विचारातें ॥१॥ कोणीएक रे बोलती । आह्मां ठावी देववस्ती ॥२॥
bolaven ten amhi atan abolane | eka chi vachanen sakalansi
बोलावें तें आम्ही आतां अबोलणे । एका चि वचनें सकळांसी ॥१॥ मेघदृष्टि कांहीं न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळे ॥ध्रु.॥
bolaven ten dharma mile | bare dole ughaduni
बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥ काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥
bolave mhanun bolaton upay | pravahen hen jay gangajal
बोलावे म्हणून बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ ॥१॥ भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी ॥ध्रु.॥
bolije ten navhen | bolanen tenhi ti ahe | bola antu baher pahe | pahatan kavan ahe
बोलिजे तें नव्हें । बोलणें तेंही ती आहे । बोला आंतु बाहेर पाहे । पाहतां कवण आहे ॥१॥ हरि हरि हरि हरि । अहं सोहं नुरेचि उरी । आत्मा एक चराचरी । एकपण नाही निर्धारीं ॥२॥
boliliya gunin nahin pavijet | deva nahin hot hit tethen
बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें ॥१॥ कवतुक तुझें नवल यापरि । घेसील तें शिरीं काय नव्हे ॥ध्रु.॥
bolilin tin kay | majha bap ani may
बोलिलीं तीं काय । माझा बाप आणि माय ॥१॥ ऐसें सांगा जी झडकरी । तुह्मी सखे वारकरी ॥ध्रु.॥
bolilin lekuren | vedin vankudin uttaren
बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ॥१॥ करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥ध्रु.॥
bolilen chi bolen padapadataluni | upajat manin nahin shanka
बोलिलें चि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥१॥ बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ध्रु.॥
bolilen vedantin aikilen siddhantin | bol neti neti anirvachya
बोलिलें वेदांतीं ऐकिलें सिद्धांतीं । बोल नेति नेति अनिर्वाच्य ॥१॥ तोचि हा बोल बोलरे मना । बोल नारा -यणा समर्पावे ॥२॥
bolile shabda nishchayachen | pratiti sache ale te
बोलिले शब्द निश्चयाचें । प्रतीति साचे आले ते ॥१॥ माझा मजचि परिचय झाला । संती दाविला हितार्थ ॥२॥
bolilon utkarshe | premaras dasatven
बोलिलों उत्कर्षे । प्रेमरस दासत्वें ॥१॥ साच करिता नारायण । जया शरण गेलों तो ॥ध्रु.॥
bolilon jaisen bolavilen deven | majhen tumhan thaven jatikul
बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥१॥ करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरी ॥ध्रु.॥
bolilon te atan | kanhin janatan nenatan
बोलिलों ते आतां । कांहीं जाणतां नेणतां ॥१॥ क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥ध्रु.॥
bolilon ten atan palaven vachan | aisen punya kon majhe ganthi
बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥१॥ जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आम्ही करूं कोठें ॥ध्रु.॥
bolilon ten kshama kara | vishvambhara aparadh
बोलिलों तें क्षमा करा । विश्वंभरा अपराध ॥१॥ सेवकांनीं कीजे सेवा । तुम्ही तों देवा देवोचि ॥२॥