भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलिजे तें नव्हें । बोलणें तेंही ती आहे । बोला आंतु बाहेर पाहे । पाहतां कवण आहे

bolije ten navhen | bolanen tenhi ti ahe | bola antu baher pahe | pahatan kavan ahe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बोलिजे तें नव्हें । बोलणें तेंही ती आहे । बोला आंतु बाहेर पाहे । पाहतां कवण आहे ॥१॥ हरि हरि हरि हरि । अहं सोहं नुरेचि उरी । आत्मा एक चराचरी । एकपण नाही निर्धारीं ॥२॥ दृश्य तो जाला नाहीं । दृश्यमात्रें त्यातेंच पाही । आहे नाहीं ऐसें जें कांहीं । प्रकाशे त्याच्याच ठायीं ॥३॥ एकपणें पाहे अनेक । अनेकीं आहे एक । एक ना नव्हे आणीक । एक जनार्दनींक तोचि देख ॥४॥