भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलावूं पाठवूं एवढी कैंची शक्ति । या रंग श्रीपती त्वां बा यावें

bolavun pathavun evadhi kainchi shakti | ya rang shripati tvan ba yaven

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बोलावूं पाठवूं एवढी कैंची शक्ति । या रंग श्रीपती त्वां बा यावें ॥१॥ येईं गा विठ्ठला पाहातसें आतां । या रंगा अनंता त्वां बा यावें ॥२॥ धांवत त्वां यावें धांवत त्वां यावें । या रंगा नाचावें पांडुरंगा ॥३॥ तिन्हीं त्रिभुवनीं तुझीच करणी । ठाव मागे चरणीं नामदेव ॥४॥