भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ

bolilon jaisen bolavilen deven | majhen tumhan thaven jatikul

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥१॥ करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरी ॥ध्रु.॥ वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥२॥ तुका म्हणे घडे अपराध नेणतां । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥३॥