भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलिलों उत्कर्षे । प्रेमरस दासत्वें

bolilon utkarshe | premaras dasatven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलिलों उत्कर्षे । प्रेमरस दासत्वें ॥१॥ साच करिता नारायण । जया शरण गेलों तो ॥ध्रु.॥ समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥२॥ तुका म्हणे लडिवाळाचें । द्यावें साचें करूनियां ॥३॥