भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलिलों ते आतां । कांहीं जाणतां नेणतां

bolilon te atan | kanhin janatan nenatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलिलों ते आतां । कांहीं जाणतां नेणतां ॥१॥ क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥ध्रु.॥ स्तुती निंदा केली। लागे पाहिजे साहिली ॥२॥ तुका म्हणे लाड । दिला तैसें पुरवा कोड ॥३॥