भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलिलें वेदांतीं ऐकिलें सिद्धांतीं । बोल नेति नेति अनिर्वाच्य

bolilen vedantin aikilen siddhantin | bol neti neti anirvachya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बोलिलें वेदांतीं ऐकिलें सिद्धांतीं । बोल नेति नेति अनिर्वाच्य ॥१॥ तोचि हा बोल बोलरे मना । बोल नारा -यणा समर्पावे ॥२॥ माझा मायबापें सोडवूनि गळा । केशवीं बांधला बोला बोल ॥३॥ नामा ह्मणे बोल बोलतांहि बोल । खेचरें दाविला प्रेमभक्ति ॥४॥