भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें

boliliya gunin nahin pavijet | deva nahin hot hit tethen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें ॥१॥ कवतुक तुझें नवल यापरि । घेसील तें शिरीं काय नव्हे ॥ध्रु.॥ नाहीं मिळे येत संचिताच्या मता । पुराणीं पाहतां अघटित ॥२॥ तुका म्हणे पायीं निरोपिला भाव । न्याल तैसा जाव सिद्धी देवा ॥३॥