भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलिलीं तीं काय । माझा बाप आणि माय

bolilin tin kay | majha bap ani may

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलिलीं तीं काय । माझा बाप आणि माय ॥१॥ ऐसें सांगा जी झडकरी । तुह्मी सखे वारकरी ॥ध्रु.॥ पत्राचें वचन । काय दिलें फिरावून ॥२॥ तुका म्हणे कांहीं । मना आणिलें कीं नाहीं ॥३॥