भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलावें तें आम्ही आतां अबोलणे । एका चि वचनें सकळांसी

bolaven ten amhi atan abolane | eka chi vachanen sakalansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलावें तें आम्ही आतां अबोलणे । एका चि वचनें सकळांसी ॥१॥ मेघदृष्टि कांहीं न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळे ॥ध्रु.॥ तुका म्हणे नाहीं समाधानें चाड । आपणा ही नाड पुढिलांसीं ॥२॥