भजनी मालिका

भजने

परबह्म पूर्ण आलें माझे घरीं । न कळे अंतरीं नृपा-चिया ॥१॥ करीति बडबड होती भूत चेष्टा । पाचारा वसिष्ठा लव-करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परब्रम्ह निष्काम तो हा गौळियां घरीं । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥ म्हणती गौळणी हरीचीं पाउलें धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परब्रह्म अविनाश आणि आनंदघन । त्याहूनि चरण गोड तुझे ॥१॥ तें जीवित्व न सोडीं अगा पंढरिनाथा । जाणसी तत्वता ह्लदय माझें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परब्रह्म पूर्ण तुझा आहे सखा । मानिसी कां दु:खा जननीये ॥१॥ इंद्राचा अवतार आहे हा अर्जुन । घेईल हा प्राण कौरवांचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परब्रह्म विश्वाकारें अवतरलें भक्तिकाजा । मूर्ति सु-नीळु सांवळी केशिराजु स्वामी माझा ॥१॥ गोविंदारे तुझें ध्यान लागो मना । पाहिजे प्रेमपद निर्मळ होत ज्ञान ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परब्रह्ममूर्ति सांवळें सगुण । पंढरी निधान वाळुंवटी ॥१॥ आनंद अमृत वोळला दरुशनें । तुटेल बंधन हेळामात्रें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

परब्रह्मा पुतळा कौस्तुभ गळां । वैजयंती माळा कंठीं शोभे ॥१॥ शंख चक्र गदा पद्म शोभा करीं । पीतांबरधारी चतुर्भुज ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परब्रह्मा मूर्ति विठ्ठल विटेवर । चंद्रभागेतीरीं उभा असे ॥१॥ तयाचे चरण आठवी वेळो वेळां । सर्व सुख सोहळा पावशील ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परब्रह्मा सगुण असे परात्पर । वेदादिकां पार न कळे ज्याचा ॥१॥ पाहतां पाहतां वेधलेसें मन । नये अनुमोदन शास्त्रादिकां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परब्रह्मा सांवळा खेळे यमुना तीरीं । सर्वें घेउनी गायी गोपवत्स नानापरी ॥१॥ कान्होबा यमुनेसी जाऊं । आदरें दहीभात खाऊं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

परब्रह्मींची गोडी नेणतीं तीं बापुडीं । संसार सांकडीं विषयभरित ॥१॥ तूंतें चुकलीरे जगजीवन रक्षा । अनुभवाविण लक्षा नयेचिरे कोणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव