भजनी मालिका
← भजनांकडे परत

परब्रम्ह निष्काम तो हा गौळियां घरीं । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी

parabramha nishkam to ha gauliyan gharin | vakya vale andu krushna navanit chori

रचनाकार: संत नामदेव · अभंग
परब्रम्ह निष्काम तो हा गौळियां घरीं । वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी ॥१॥ म्हणती गौळणी हरीचीं पाउलें धरा । रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा ॥२॥ लपत छपत येतो हरी हा राजभुवनीं । नंदासी टाकूनि आपण बैसे सिंहासनीं ॥३॥ सांपडला देव्हारीं यासी बांधी दाव्यांनीं । शंख चक्र गदा पद्म शारंगपाणी ॥४॥ बहुता कष्टें बहुता पुण्यें जोडलें देवा । अनंत पवाडे तुमचे न कळती मावा ॥५॥ नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा । जन्मोजन्मीं द्यावी तुमची चरणसेवा ॥६॥